First Dahi Handi Celebration: देशात सर्वात पहिला 'दही हंडी' उत्सव कुठं साजरा झाला?

Anirudha Sankpal

दही हंडीचा उत्सव

दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी अत्यंत उत्साहात 'दही हांडी'चा उत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये मटकी फोडण्याची स्पर्धा होते.

लोणी अत्यंत प्रीय

भगवान श्रीकृष्णाला लहानपणी लोणी अतिशय प्रिय असल्याने ते सवंगड्यांसोबत गोपियांच्या घरची मटकी फोडून लोणी चोरायचे.

माखन चोर

गोपिका कृष्णापासून दही-लोणी सुरक्षित ठेवण्यासाठी ते उंच ठिकाणी हांडी टांगून ठेवत असत, ज्याची आठवण या उत्सवातून ताजी होते.

श्रीकृष्णाच्या बाल लीला

श्रीमद्भागवत महापुराणाच्या दशम स्कंधामध्ये श्रीकृष्णाच्या अशा अनेक बाललीलांचे आणि माखनचोरीचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे.

श्रीकृष्णांचे गोविंदा

हांडी फोडण्याच्या या उत्सवात गोविंदा पथके एकत्र येऊन मानवी थर (पिरामिड) रचतात आणि ढोल-ताशांच्या गजरात मटकी फोडतात.

ऐतिहासिक परंपरा

दही हांडी फोडण्याच्या या ऐतिहासिक परंपरेची सुरुवात १९०७ मध्ये नवी मुंबईतील घनसोली गावात सर्वप्रथम झाली होती.

देशभरात विस्तार

घनसोलीत सुरू झालेली ही परंपरा आज मुंबई, महाराष्ट्रसह देशभरात मोठ्या प्रमाणावर एका उत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जाते.

टीम वर्क

हा उत्सव केवळ धार्मिक नसून तो समाजात एकता, परस्पर सहकार्य आणि टीम वर्कची भावना निर्माण करण्याची प्रेरणा देतो.

दहीहंडी | File Photo
येथे क्लिक करा