डॉक्टर सांगतात 'या' 5 लोकांनी पपई खाणे टाळावे

पुढारी वृत्तसेवा

पपई सर्वांसाठी फायदेशीर नसते

डॉक्टर सांगतात या 5 लोकांनी पपई खाणे टाळावे. नाहीतर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

Papaya | Pudhari

पपईचे फायदे

पपईला “सुपरफ्रूट” म्हटले जाते. यात व्हिटॅमिन A, C, E आणि शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतात. पचन सुधारण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते.

Papaya | Pudhari

कोणासाठी धोका?

पपई अनेकांसाठी फायदेशीर असली तरी काही लोकांसाठी ती धोकादायक ठरू शकते. विशेषतः कच्ची किंवा जास्त प्रमाणात खाल्ल्यास समस्या वाढू शकतात.

Papaya | Pudhari

गर्भवती महिलांनी टाळावी

डॉक्टरांच्या मते गर्भवती महिलांनी कच्ची किंवा अर्धवट पिकलेली पपई खाऊ नये.
यात असलेले लेटेक्स गर्भाशयाचा त्रास वाढवू शकतात.

Papaya | Pudhari

हृदयाचा आजार असलेल्यांनी सावध

ज्यांना हृदयाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी पपई जपून खावी.

Papaya | Pudhari

अॅलर्जी असलेल्यांसाठी धोकादायक

पपईमधील काही प्रथिने नैसर्गिक लेटेक्ससारखी असतात. म्हणून ज्यांना लेटेक्स अॅलर्जी आहे त्यांना खाज, शिंक किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

Papaya | Pudhari

हायपोथायरॉईड असलेल्यांनी जपून खावी

थायरॉईडची समस्या असलेल्या लोकांनी पपई जास्त प्रमाणात खाणे टाळावे. ती थायरॉईड हार्मोनवर परिणाम करू शकते.

Papaya | Pudhari

किडनी स्टोन

पपईमध्ये व्हिटॅमिन C भरपूर असते. जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरात ऑक्सलेट्स वाढू शकतात. यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.

Papaya | Pudhari

किती खावी?

बहुतेक लोकांसाठी पपई सुरक्षित आणि पौष्टिक आहे. पण मध्यम प्रमाणात खाणे महत्त्वाचे. कोणतीही आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Papaya | Pudhari

बाजारातील केळी नैसर्गिक आहेत की केमिकल कशी ओळखाल?

Bananas | Pudhari
येथे क्लिक करा