बाजारातील केळी नैसर्गिक आहेत की केमिकल कशी ओळखाल?

पुढारी वृत्तसेवा

केळी नैसर्गिक की रसायनयुक्त

केळी खरेदी करताना या 5 गोष्टी नक्की तपासा.

Bananas | Pudhari

केळी रसायने टाकून का पिकवली जातात?

केळी साधारणपणे हिरवी तोडली जातात आणि त्याची वाहतूक केली जाते. लवकर पिकवण्यासाठी काही व्यापारी रसायनांचा वापर करतात.

Bananas | Pudhari

धोकादायक रसायन

कॅल्शियम कार्बाइडसारख्या रसायनांचा वापर करून केळी पिवळी केली जातात. मात्र अशा केळ्यांचा रंग बदलतो, पण आतून ती पूर्ण पिकत नाहीत.

Bananas | Pudhari

रंगावरून ओळख

नैसर्गिक पिकलेल्या केळ्यांवर छोटे तपकिरी ठिपके दिसतात. रसायनांनी पिकवलेली केळी एकसारखी आणि चमकदार पिवळी दिसतात.

Bananas | Pudhari

साल तपासा

नैसर्गिक केळ्याची साल थोडी मऊ आणि नैसर्गिक दिसते. रसायनांनी पिकवलेल्या केळ्याची साल जास्त गुळगुळीत किंवा मेणासारखी वाटते.

Bananas | Pudhari

सुगंधावरून ओळख

पिकलेल्या केळ्यांना गोड आणि हलका सुगंध असतो. रसायनांनी पिकवलेल्या केळ्यांचा वास विचित्र असतो.

Bananas | Pudhari

देठ पाहा

नैसर्गिक केळ्याचा देठ थोडा सुकलेला असतो. रसायनांनी पिकलेल्या केळ्याचा देठ हिरवा आणि ताजा दिसतो.

Bananas | Pudhari

आतला भाग तपासा

नैसर्गिक केळी आतून मऊ असतात. रसायनांनी पिकलेली केळी कधी कधी कोरडी किंवा कडक असतात.

Bananas | Pudhari

शरीरावर परिणाम

अशा केळ्यांमुळे काही लोकांना अॅसिडिटी, पोट फुगणे किंवा घशाचा त्रास होऊ शकतो.

Bananas | Pudhari

सुरक्षित उपाय

थोडी हिरवी केळी खरेदी करून घरीच पिकू द्या. सफरचंदासोबत ठेवल्यास केळी नैसर्गिकरीत्या लवकर पिकतात.

Bananas | Pudhari

LPG सिलेंडर की इंडक्शन – स्वयंपाकासाठी कोणता पर्याय स्वस्त?

LPG vs Induction | Pudhari
येथे क्लिक करा