'या' व्यक्तिंनी मध खाऊ नये, जाणून घ्या मध खाण्याची योग्य वेळ अन् पद्धत

मोनिका क्षीरसागर

लहान मुलांच्या पचनसंस्थेसाठी मध घातक ठरू शकतो, कारण यामुळे त्यांना 'बोट्युलिझम' नावाचा गंभीर आजार होण्याचा धोका असतो.

मधात नैसर्गिक साखर असली तरी ती रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते, त्यामुळे मधुमेहींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचे सेवन करू नये.

ज्यांना परागकण (Pollen) किंवा मधमाशांच्या दंशाची ऍलर्जी आहे, त्यांना मध खाल्ल्याने खाज किंवा सूज येण्यासारखे त्रास होऊ शकतात.

ज्यांना वारंवार अपचन किंवा गॅसचा त्रास होतो, त्यांनी मध कमी प्रमाणात खावे कारण ते पचायला जड असू शकते.

मध कधीही थेट विस्तवावर गरम करू नये किंवा उकळत्या पाण्यात टाकू नये; यामुळे त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात आणि ते शरीरासाठी विषारी ठरू शकते.

वजन कमी करण्यासाठी किंवा आरोग्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध आणि लिंबू पिळून घेणे ही सर्वात उत्तम पद्धत मानली जाते.

रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात एक चमचा मध टाकून घेतल्याने शांत झोप लागते आणि शरीराची शक्ती वाढते.

मध औषधी गुणधर्मांनी युक्त असला तरी त्याचे अतिसेवन टाळावे; दिवसभरात १ ते २ चमचे मध पुरेसा असतो.

येथे क्लिक करा...