Asit Banage
कमी ब्लड शुगर असलेले लोक
आवळा रक्तातील साखर कमी करू शकतो, त्यामुळे कमी ब्लड शुगर असलेल्या लोकांनी आवळा खाणे टाळावे .
पोटाचे विकार असणारे लोक
जास्त प्रमाणात आवळा खाल्ल्याने पोटात जळजळ, गॅस, आम्लता आणि अतिसार होऊ शकतो. त्यामुळे पोटाचे विकार असलेल्या लोकांनी आवळा खाणे टाळले पाहिजे.
किडनीचे रुग्ण
किडनीचा आजार असलेल्या व्यक्तींनी आवळा खाऊ नये, कारण यामुळे शरीरातील सोडियमची पातळी वाढून किडनीच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.
शस्त्रक्रिया करणारे लोक
ज्या व्यक्तींची शस्त्रक्रिया होणार आहे त्यांनी शस्त्रक्रियेच्या किमान दोन आठवडे आधी आवळा खाऊ नये , कारण यामुळे रक्तस्त्रावाचा धोका वाढू शकतो.
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी आवळा सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सर्दी खोकला
आवळा थंड असतो. त्यामुळे सर्दी खोकला ताप असणा-यांनी आवळा खाऊ नये.
थंड प्रकृती असलेल्यांनी
ज्या लोकांची प्रकृती थंड आहे किंवा ज्यांना सर्दीचा त्रास आहे त्यांनी रात्री कच्चा आवळा खाऊ नये.
जास्त सेवन टाळा
जास्त प्रमाणात आवळा खाल्ल्यास पोटाचे त्रास उद्भवू शकतात.