Passage du Gois : दिवसातून केवळ दोनदा उघडणारा फ्रान्सचा 'जादुई' मार्ग

Namdev Gharal

हा रस्‍ता दिवसातून केवळ दोन वेळाच तेही ३ तासच खुला राहतो, इतरवेळा हा पाण्यातच असतो

हे सर्व घडते ते समुद्राच्या भरती- ओहोटीमुळे, भरतीवेळी हा रस्‍ता पूर्ण पाण्यात जातो व ओहोटीवेळी खुलतो

फ्रान्सच्या Vendée (वांदे) प्रांतातील हा एक वैशिष्‍ट्यपूर्ण व ऐतिहासिक मार्ग आहे

१८ व्या शतकात याची निर्मिती झाली, आजही तो वापरला जातो

फ्रान्सच्या इल द नोआर्मुतिये या बेटाला मुख्य भूमीशी जोडण्याचे काम हा मार्ग करतो

या रस्‍त्‍यावर भरतीवेळी १३ फूट पाणी असते. त्‍यामुळे रस्‍ता कुठे आहे हे ओळखूच शकत नाही

हा रस्ता साधारण ४.३ किमी लांब आहे. भरती-ओहोटीवर अवलंबून असल्याने यावरून जाण्यासाठी ठराविक वेळेचाच वापर करता येतो.

भरती अचानक आली तर प्रवासी अडकू शकतात, म्हणून रस्त्यावर काही ठिकाणी उंच मनोरे बांधले आहेत.

अचानक भरती आली तर तिथे माणसे भरती उतरेपर्यंत सुरक्षित थांबू शकतात.

भरती-ओहोटीवर अवलंबून असल्याने यावरून जाण्यासाठी ठराविक वेळेचाच वापर करता येतो.

समुद्राखाली जाणारा आणि पुन्हा उघडणारा असा हा जगातील फारच थोड्या रस्त्यांपैकी एक आहे.

रस्‍त्‍याच्या या वैशिष्‍ट्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी हा मार्ग पाहण्यासाठी असते

पक्षी जगतातील ‘कसाई‘