इंटरमिटेंट फास्टिंग कोणी करु नये ? जाणून घ्या कोणासाठी धोकादायक?
पुढारी वृत्तसेवा
वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग (Intermittent Fasting) करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.
Canva
इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे उपाशी राहण्याचं वेळापत्रक. यामध्ये एखादी व्यक्ती दररोज किंवा आठवड्यातून काही दिवस ठराविक वेळ उपाशी राहते.
Canva
संशोधनातून दिसून आले आहे की, खाण्याच्या वेळेत आठ तासांचे अंतर ठेवणे हृदयविकाराचा धोका वाढवू शकतो.
Canva
इंटरमिटेंट फास्टिंगमुळे रक्तातील साखरेच्या पातळीत बदल होऊ शकतो. मधुमेहग्रस्तांनी अशा प्रकारचा उपवास करण्यापूर्वी विशेष काळजी घ्यावी.
Canva
गर्भधारणेदरम्यान आई आणि बाळ दोघांनाही योग्य पोषणाची गरज असते. या महत्त्वाच्या काळात इंटरमिटेंट फास्टिंग आवश्यक पोषकतत्त्वे आणि ऊर्जा पुरवू शकत नाही.
Canva
अति खाणे यासारखे खाण्याचे विकार (फूड डिसऑर्डर) झालेल्यांनी इंटरमिटेंट फास्टिंग करु नये.
Canva
किशोरवयीन मुलांना अधिक पोषणाची गरज असते. इंटरमिटेंट फास्टिंगमुळे पोषणात अडथळा येऊ शकतो. याचा त्यांच्या वाढीवर व विकासावर परिणाम होऊ शकतो.
Canva
पोषणतत्त्वांची कमतरता असणार्यांसाठी इंटरमिटेंट फास्टिंग आणखी हानीकारक ठरू शकते.
Canva
वरील माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आहारात आणि जीवनशैलीत बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
Canva
येथे क्लिक करा.