Ginger Tea Side Effect: पावसाळ्यात उठसूठ आल्याचा चहा घेताय... सावधान! आरोग्य येईल धोक्यात

Anirudha Sankpal

मर्यादित सेवन आवश्यक

तज्ज्ञांच्या मते दिवसातून ४ ग्रॅमपेक्षा जास्त आल्याचे सेवन करू नये; जास्त प्रमाणात आल्याचा चहा किंवा काढा पिणे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते.

एसिडिटी आणि जळजळ

आल्याच्या चहाचे अतिसेवन केल्यास अनेकांना छातीत जळजळ, एसिडिटी किंवा पोटात तीव्र अस्वस्थता जाणवू शकते.

अॅलर्जीची लक्षणे

हा चहा प्यायल्यानंतर अंगावर खाज सुटणे, पुरळ उठणे किंवा तोंडात पुरळ येणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पित्ताशयाच्या समस्या (Gallbladder)

ज्या लोकांना आधीपासूनच पित्ताशयाशी (गॉलब्लॅडर) संबंधित काही आजार आहेत, त्यांनी आल्याचा चहा पिणे टाळावे किंवा डॉक्टरांना विचारावे.

कमी रक्तदाब (Low BP)

आले हे रक्तदाब कमी करण्यास कारणीभूत ठरते, त्यामुळे ज्यांचा बीपी आधीच कमी असतो किंवा जे औषधे घेतात त्यांनी सावध राहावे.

रक्त पातळ होण्याचा धोका

आल्यामध्ये रक्त पातळ करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात, त्यामुळे ब्लीडिंग डिसऑर्डर असलेल्यांनी किंवा रक्त पातळ होण्याचे औषध घेणाऱ्यांनी हा चहा टाळावा.

आरोग्यासाठी फायदे

योग्य प्रमाणात आल्याचा चहा प्यायल्यास मळमळ, उलट्या, अपचन आणि पोट खराब होणे यांसारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो.

सूज कमी करण्यास उपयुक्त

आल्यामध्ये असलेल्या 'जिंजरॉल' नावाच्या घटकामुळे शरीरातील अंतर्गत सूज आणि वेदना कमी होण्यास मोठी मदत होते.

येथे क्लिक करा