Anirudha Sankpal
मनुके हे शरीराची ताकद वाढवणारे आणि अशक्तपणा, थकवा दूर करण्यासाठी अत्यंत पौष्टिक मानले जातात.
रक्ताची कमतरता (अॅनिमिया) दूर करण्यासाठी मनुके उपयुक्त ठरतात, कारण ते शरीरातील हिमोग्लोबीन वाढवण्यास मदत करतात.
रात्रभर पाण्यात भिजवलेले मनुके सकाळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर चांगला फायदा होतो.
मनुक्यामध्ये नैसर्गिक साखर, कार्बोहायड्रेट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे स्नायूंचे पोषण करून शरीर निरोगी ठेवतात शक्ती वाढवतात.
शरीरातील उष्णता, जास्त तहाण आणि अशक्तपणा यांसारख्या समस्यांवर मनुका सेवन करणे फायदेशीर ठरते.
आयुर्वेदानुसार, जर एखाद्या व्यक्तीला जुलाब (अतिसार) लागले असतील, तर मनुके अजिबात खाऊ नयेत.
काळे मनुके खाल्ल्याने मल निस्सारण (bowel movement) वाढू शकते, त्यामुळे जुलाब असताना पोट बिघडण्याचा धोका असतो.
पोटाचे गंभीर विकार किंवा विशिष्ट शारीरिक त्रास असल्यास आहारात मनुके समाविष्ट करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.