Bank FD Security: एकाच बँकेत ठेवलेली ५ लाखांची FD तुम्हाला वाटते तितकी नाही सुरक्षित

Anirudha Sankpal

मर्यादित विमा संरक्षण

डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) द्वारे पात्र बँक ठेवींवर प्रति ठेवीदार, प्रति बँक जास्तीत जास्त ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते.

खात्यांचे एकत्रिककरण

एकाच बँकेतील बचत खाते, वेगवेगळ्या मुदत ठेवी (FD) यांसारख्या सर्व ठेवी एकाच अधिकारात असल्यास त्या एकत्र करून एकूण रकमेवर ५ लाखांची मर्यादा लागू होते.

शाखांचा नियम

एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये ठेवी ठेवल्या तरीही त्या सर्व ठेवी विम्याच्या उद्देशाने एकत्रित केल्या जातात.

FD सुरक्षित कशी करायची

५ लाखांपेक्षा जास्त रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी ती एकाच बँकेत न ठेवता वेगवेगळ्या बँकांमध्ये विभाजित करणे हा एक व्यावहारिक उपाय आहे.

व्याजाचा देखील समावेश

५ लाखांच्या विम्याच्या मर्यादेमध्ये केवळ मुद्दल नाही, तर जमा झालेले व्याज (Accrued Interest) देखील समाविष्ट केले जाते.

कधी लागू होतो विम्याचा नियम?

DICGC चा हा विमा नियम बँक लिक्विडेशन, परवाना रद्द होणे किंवा पैसे काढण्यावरील निर्बंध यांसारख्या विशिष्ट प्रसंगी लागू होतो.

बॅक निवडताना कोणती काळजी घ्यावी?

मोठी FD ठेवण्यापूर्वी संबंधित बँक DICGC च्या विमा उतरवलेल्या बँकांच्या यादीत आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे.

india first bank

यांना विम्याचे कवच नाही

म्युच्युअल फंड, शेअर्स, बाँड्स आणि ईटीएफ (ETFs) यांसारख्या वित्तीय उत्पादनांना DICGC चे ठेवी विमा संरक्षण मिळत नाही.

येथे क्लिक करा