पुढारी वृत्तसेवा
संत्री आरोग्यदायी असली तरी, काही विशिष्ट लोकांसाठी ती त्रासदायक ठरू शकतात
ॲसिडिटीचा त्रास
संत्र्यामध्ये आम्ल (Acid) असते. यामुळे छातीत जळजळ आणि ॲसिडिटी वाढू शकते.
किडनीचे रुग्ण
संत्र्यात जास्त पोटॅशियम असते. किडनी कमकुवत असल्यास हे पोटॅशियम शरीराबाहेर पडत नाही, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
दातांच्या समस्या असल्यास
संत्र्यातील आंबटपणामुळे दातांचे कवच (Enamel) खराब होऊ शकते. यामुळे दात शिवशिवणे किंवा दुधणे वाढू शकते.
पोटाचे विकार
जास्त संत्री खाल्ल्याने पोटात दुखणे, गॅस किंवा जुलाब होऊ शकतात. विशेषतः ज्यांचे पचनसंस्था संवेदनशील आहे त्यांनी जपून खावे.
औषधे घेणारे लोक
रक्तदाबाची औषधे (उदा. बीटा-ब्लॉकर्स) घेणाऱ्यांनी संत्री टाळावीत. यामुळे रक्तातील पोटॅशियमची पातळी अचानक वाढू शकते.