'या' व्यक्तिंनी पेरू खाऊ नये, आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

मोनिका क्षीरसागर

पेरू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी, काही लोकांनी ते टाळणेच चांगले.

पेरूमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे ज्यांना गॅस, पोटफुगी किंवा पोटाचे विकार आहेत त्यांनी तो खाऊ नये.

जास्त प्रमाणात पेरू खाल्ल्यास पचनसंस्थेवर ताण येतो आणि जुलाब होण्याची शक्यता वाढते.

रक्तातील साखर कमी करण्यासाठी औषध घेणाऱ्यांनी पेरू खाणे टाळावे, अन्यथा साखरेची पातळी धोकादायकरीत्या कमी होऊ शकते.

ज्यांना रक्तदाब (Blood Pressure) कमी होण्याची समस्या आहे, त्यांनीही पेरूचे सेवन जपून करावे.

नुकतीच कोणतीही शस्त्रक्रिया झाली असल्यास, पेरू खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

पेरूची प्रकृती थंड असल्यामुळे सर्दी, खोकला किंवा कफ झाला असल्यास पेरू खाणे टाळावे.

काही लोकांना पेरूची ॲलर्जी असू शकते, अशा वेळी खाज येणे किंवा सूज येणे असे त्रास होऊ शकतात.

गरोदरपणात किंवा स्तनपान करताना पेरूचे अतिसेवन करणे बाळासाठी किंवा आईसाठी हानिकारक ठरू शकते.

येथे क्लिक करा