पुढारी वृत्तसेवा
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठं नाव त्रिशा कृष्णन. तिच्या अभिनयाने आणि स्टाइलने ती आजही इंडस्ट्रीवर राज्य करते
त्रिशाने करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली. मिस चेन्नई स्पर्धा जिंकून तिने ग्लॅमर वर्ल्डमध्ये एंट्री केली
2002 मध्ये मौनम पेसियाधे या चित्रपटातून हिरोईन म्हणून पदार्पण. त्यानंतर 'वर्षम'मुळे ती स्टार बनली
घिल्ली, आरू, पौर्णमी, स्टॅलिन सारखे अनेक हिट चित्रपट दिले. प्रत्येक भूमिकेत वेगळी छाप
2010 मध्ये खट्टा मीठा मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू. अक्षय कुमार सोबत काम करत हिंदी प्रेक्षकांची मनं जिंकली.
कमल हसन आणि रजनीकांत सारख्या दिग्गजांसोबत काम. तिची ओळख आता पॅन-इंडिया स्टार म्हणून आहे.
त्रिशा एका चित्रपटासाठी तब्बल 10 कोटी मानधन घेते. काही प्रोजेक्ट्समध्ये 12 कोटींपर्यंत कमाई होते.
हैदराबाद आणि चेन्नईमध्ये कोट्यवधींची घरे. Mercedes, BMW, Range Rover सारख्या लक्झरी कार्स तिच्याकडे आहेत.
त्रिशाची एकूण संपत्ती सुमारे 85 कोटी आहे. ब्रँड एंडोर्समेंटमधूनही मोठी कमाई होते.
दोन दशकांनंतरही त्रिशाचा दबदबा कायम. टॅलेंट आणि मेहनतीमुळे ती अजूनही सुपरहिट आहे.