पुढारी वृत्तसेवा
चहा पिल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतात जाणून घेऊयात.
गरम चहावर गार पाणी पिल्याने दातांच्या तापमानात अचानक बदल होतो. यामुळे दातांवरील इनॅमल कमकुवत होतं.
यामुळे दातांवरील संरक्षणात्मक थर गेल्याने दात शिवशिवणे, दातांमधून रक्त येणे अशा समस्या उद्भऊ शकतात.
चहामध्ये कॅफिन, टॅनिन असते. लगेच पाणी पिल्याने पोटातील पाचक रसाची तीव्रता कमी होते. गॅस, पोट फुगणे तक्रारी उद्भवू शकतात.
गरम चहा-गार पाणी यांच्या तापमानातील फरक पोटातील संवेदनशील अस्तरांना इजा पोहाचवू शकतो. ही सवय अल्सरची समस्या वाढवू शकते.
सततच्या या सवयींमुळे शरीरातील तापमानात फरक होउन घसा खवखवणे, सर्दी होण्याचे प्रमाण वाढते.
चहा घेतल्यावर कमीतकमी 15 ते 20 मिनिटांनी पाणी प्यावे.
चहा पिण्यापूर्वी 10-15 मिनिटे आधी पाणी पिणे उत्तम.