London Rally : लंडनमध्‍ये लाखो नागरिकांना रस्‍त्‍यावर उतरवणारा टोमी रॉबिन्सन नेमका आहे तरी कोण?

पुढारी वृत्तसेवा

लंडनमध्ये शनिवारी (दि. १३ सप्‍टेंबर) आयोजित मोर्चामध्ये एक लाखाहून अधिक नागरिक सहभागी झाले होते.

'युनाईट द किंगडम' नावाच्या मोर्चाचे नेतृत्व उजव्या विचारसरणीच्या वादग्रस्‍त नेता टोमी रॉबिन्सन याने केले.

'स्थलांतरा'विरोधातील या मोर्चाला हिंसक वळण लागले. आंदाेलकांनी केलेल्‍या हिंसाचारात २६ पोलीस जखमी झाले.

टोमी रॉबिन्सन याचे मूळ नाव स्टीफन यॅक्सली-लेनॉन असून, अल्‍पवधीत त्‍याने  उजव्या विचारसरणीचा नेता म्‍हणून ओळख निर्माण केली आहे.

त्‍याने इस्लामविरोधी निदर्शनांसाठी ओळखल्‍या जाणार्‍या 'इंग्लिश डिफेन्स लीग' या संघटनेची स्‍थापना केली आहे.

द्वेषपूर्ण भाषणांच्या नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे २०१८ ट्विटरने, २०१९ मध्ये फेसबुक, इंस्टाग्रामने याच्‍यावर बंदी घातली होती.

मस्‍क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर रॉबिन्सनचे अकाउंट पुन्‍हा सुरु झाले. आता X वर त्‍याचे एक दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

रॉबिन्सनच्‍या संघटनेला अमेरिकेतील 'मिडल ईस्ट फोरम'कडून आर्थिक मदत मिळते.

२०२४ मध्ये साऊथपोर्टमध्ये झालेल्या एका हत्‍येनंतर दंगल भडकवल्याचा त्‍याच्‍यावर आरोप झाला होता.

टोमी रॉबिन्सन याच्‍यावर हल्‍ला, पासपोर्ट फसवणूक, आर्थिक फसवणूक आणि न्‍यायालयाचा अवमान असे अनेक आरोप असून आतापर्यंत त्‍याने चार वेळा तुरुंगवासही भोगला आहे.

येथे क्‍लिक करा.