Billionaire Education: कोणते शिक्षण बनवते अब्जाधीश? जाणून घ्या जगातील अब्जाधीशांचे शिक्षण
पुढारी वृत्तसेवा
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती केवळ त्यांच्या संपत्तीच्या शिखरावर नाहीत, तर त्यांचे शैक्षणिक जीवनही वैविध्यपूर्ण आहे. अब्जाधीशांच्या यादीत शिक्षण अर्धवट सोडलेल्यांचाही समावेश आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे लॅरी एलिसन यांनी युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय आणि युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील शिक्षण अर्धवट सोडले. त्यांची एकूण संपत्ती ३९३ अब्ज डॉलर्स आहे.
टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी पेनसिल्वेनिया विद्यापीठात शिक्षण घेतले असून, त्यांच्याकडे भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांची पदवी आहे. त्यांची संपत्ती ३८५ अब्ज डॉलर्स आहे.
मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक सुरु करण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठातील शिक्षण अर्धवट सोडले. मेटाचे सीईओ झुकरबर्ग हे जगातील सर्वात प्रसिद्ध शिक्षण अर्धवट सोडलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत.
ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले. त्यांची संपत्ती २४३ अब्ज डॉलर्स आहे.
गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज यांनी मिशिगनमधून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी आणि स्टॅनफोर्डमधून कॉम्प्युटर सायन्सची पदव्युत्तर पदवी घेतलीआहे.
गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन यांनी मेरीलँडमधून गणित आणि कॉम्प्युटर सायन्सची पदवी मिळवली, तर स्टॅनफोर्डमधून कॉम्प्युटर सायन्सची पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.
५१ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट यांनी पॅरिसमधील 'इकोल पॉलिटेक्निक'मधून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.
मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ स्टीव्ह बाल्मर यांनी हार्वर्डमधून उपयोजित गणित आणि अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली. नंतर त्यांनी स्टॅनफोर्डमधील एमबीएचे शिक्षण अर्धवट सोडले.
प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्याकडे नेब्रास्का येथून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची पदवी आणि कोलंबियामधून अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
येथे क्लिक करा.