पुढारी वृत्तसेवा
बिग बॉस मराठी सिझन 6 मध्ये तन्वीने सर्व स्पर्धकांना मागे टाकत विजय मिळवला
रत्नागिरीत जन्मलेली, साध्या घरातून आलेली, आज मराठी इंडस्ट्रीतील ओळखीचं नाव म्हणजे तन्वी कोलते
पुण्यातून IT मध्ये B.Tech पूर्ण पण करिअर मॉडेलिंग आणि अभिनयात केलं
मिस रत्नागिरी 2018, मिस गोवा 2020 इथूनच तिच्या ग्लॅमरचा प्रवास सुरू झाला
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत महत्त्वाची भूमिका केली, पण Bigg Boss साठी मालिका सोडली
“लोकांनी मला ओळखावं, हीच इच्छा होती…” तन्वीच्या या वक्तव्यात तिचा संघर्ष दिसतो
15 लाख रोख बक्षीस, ट्रॉफी आणि इलेक्ट्रिक स्कूटर, 10 लाखांचा डायमंड व्हाउचर तिला मिळाला आहे.
वडिलांच्या निधनानंतरचा संघर्ष आणि आज मिळालेली मोठी ओळख तन्वीची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे