पुढारी वृत्तसेवा
CJP चे प्रवक्ते म्हणून चर्चेत आलेले सौरव दास सध्या देशभरात चर्चेत आहेत. पण आंदोलनापूर्वी ते नेमके काय करत होते?
NEET पेपर लीक प्रकरणावर CJP च्या आंदोलनात सौरव दास यांनी पक्षाची भूमिका माध्यमांसमोर प्रभावीपणे मांडली. सरकारसोबतच्या चर्चेतही त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
सार्वजनिकरीत्या उपलब्ध माहितीनुसार, सौरव दास यांनी पत्रकारिता क्षेत्रात करिअर केले आहे. मात्र त्यांच्या शैक्षणिक पदवीबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
सौरव दास यांनी 2020 पासून पत्रकारितेत सक्रिय काम सुरू केले. यापूर्वी त्यांनी NDTV मध्ये इंटर्नशिप करून पत्रकारितेचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले.
NDTV नंतर त्यांनी Media Monks आणि Content Associates सारख्या संस्थांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र (Freelance) इन्व्हेस्टिगेटिव्ह पत्रकार म्हणून काम सुरू केले.
कायदा, न्यायव्यवस्था, प्रशासन, गुन्हे आणि RTI यांसारख्या विषयांवर सौरव दास यांनी सातत्याने लेखन आणि रिपोर्टिंग केले आहे.
त्यांचे लेख Al Jazeera, The Hindu, The Caravan, The Quint, BOOM Live, Firstpost, LiveLaw, The Wire यांसारख्या माध्यमांमध्ये प्रकाशित झाले आहेत.
पत्रकारितेबरोबरच सौरव दास हे Climate Action Front या उपक्रमाचे सहसंस्थापक (Co-founder) असल्याची माहिती त्यांच्या सार्वजनिक प्रोफाइलमध्ये आहे.
CJP च्या वतीने केंद्रीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेसाठी सौरव दास आणि आशुतोष रांका यांची प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली होती.
NEET आंदोलनादरम्यान माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडणे, पत्रकारितेतील अनुभव आणि सरकारशी चर्चेतील सहभाग यामुळे सौरव दास चर्चेत आहेत.