पुढारी वृत्तसेवा
सध्या निदर्शने आणि आंदोलनांचे मुख्य केंद्र बनलेले दिल्लीचे जंतर-मंतर ही केवळ ऐतिहासिक वास्तू नसून, तो एका काळातील खगोलशास्त्राचा अद्भुत आविष्कार आहे.
जंतर-मंतरचे निर्माण १७२४ मध्ये जयपूरचे महाराज सवाई जयसिंह द्वितीय यांनी केले होते. त्यांना गणित आणि खगोलशास्त्राची (Astronomy) प्रचंड आवड होती.
त्या काळात आधुनिक घड्याळे नव्हती. त्यामुळे सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांच्या स्थितीवरून वेळ आणि दिवसाचा अचूक अंदाज लावण्यासाठी ही वेधशाळा उभारण्यात आली.
दिल्लीच्या यशोगाथेनंतर महाराज जयसिंह यांनी जयपूर, वाराणसी, उज्जैन आणि मथुरा येथेही अशाच जंतर-मंतर वेधशाळांची निर्मिती केली.
जुन्या खगोलशास्त्रीय तक्त्यांमधील त्रुटी दूर करून सण-उत्सवांच्या अचूक तारखा ठरवण्यासाठी या यंत्रांवर पडणाऱ्या सूर्य आणि चंद्राच्या प्रकाशाचा वापर केला जात असे.
सूर्य आणि चंद्रासोबतच बुध, मंगल, गुरु आणि शुक्र यांसारख्या ग्रहांची अवकाशभ्रमणातील अचूक स्थिती जाणून घेण्यासाठी हे यंत्र अत्यंत प्रभावी होते.
जंतर-मंतरवरून केवळ वेळच नाही, तर सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आणि आगामी हवामानाच्या बदलांची पूर्वकल्पनाही सहज मिळत असे.
'सम्राट यंत्र' हे दगडापासून बनवलेले जगातील सर्वात मोठे सूर्यघड्याळ आहे. याद्वारे स्थानिक वेळ आणि सूर्याची उंची मोजली जात असे.
'जय प्रकाश यंत्र' हे दोन अर्धगोलाकार कटोऱ्यांसारख्या रचनेचे आहे. याच्या मदतीने सूर्य, तारे आणि इतर अवकाशीय वस्तूंचे स्थान निश्चित केले जाई.
'राम यंत्र' दोन दंडाकृती (Cylinder) संरचनांचे बनलेले आहे. अवकाशातील कोणत्याही खगोलीय पिंडाची उंची आणि दिशा (Altitude & Azimuth) मोजण्यासाठी याचा वापर होई.
'मिश्र यंत्र' हे ५ वेगळ्या यंत्रांचे एकत्रित रूप आहे. वर्षातील सर्वात मोठा व सर्वात छोटा दिवस आणि दुपारी १२ वाजण्याची अचूक वेळ ठरवण्यासाठी हे वापरले जाई!