प्रसिद्ध युट्यूबर आणि 'बिग बॉस मल्याळम' फेम जॅस्मिन जाफर एका नव्या वादामुळे चर्चेत आली आहे..केरळमधील प्रसिद्ध गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिराच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिच्यावर जोरदार टीका होत आहे..जॅस्मिनने मंदिराच्या पवित्र तीर्थकुंडात (तलावात) पाय धुतानाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. . हा व्हिडिओ व्हायरल होताच मंदिर प्रशासनाने तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे..मंदिराच्या नियमांनुसार, हा कुंड भगवान श्रीकृष्णाच्या विधींमध्ये स्नानासाठी वापरला जातो..मंदिर परिसरात गैर-हिंदूंना प्रवेश नसून फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीवरही बंदी आहे. २४ वर्षीय जॅस्मिनने या सर्व नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे..जॅस्मिन ही एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. 'बिग बॉस मल्याळम'च्या सहाव्या पर्वात ती दुसरी उपविजेती ठरल्याने तिला मोठी प्रसिद्धी मिळाली..शोदरम्यान तिचे सह-प्रतिस्पर्धी गॅब्रिएल जोसे याच्यासोबतचे संबंध चर्चेत आले होते. त्यावेळी जॅस्मिनचा साखरपुडा अफझल आमिरशी झाला होता. .पण जॅस्मिनने नंतर गॅब्रिएलवर प्रेम असल्याचे कबूल केले, ज्यामुळे तिचं लग्न मोडलं..वादानंतर जॅस्मिनने आपला इन्स्टाग्राम रील डिलीट केला आणि एका स्टोरीद्वारे जाहीर माफी मागितली..दरम्यान, या घटनेनंतर मंदिरात 'शुद्धीकरण विधी' करण्यात आला. .दाक्षिणात्य सिनेमात अभिनेत्रीच्या नाभीवर फोकस का केला जातो? डेझी शाहचा धक्कादायक खुलासा.लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.