Daisy Shah: दाक्षिणात्य सिनेमात अभिनेत्रीच्या नाभीवर फोकस का केला जातो? डेझी शाहचा धक्कादायक खुलासा
पुढारी वृत्तसेवा
कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री डेझी शाहने नुकत्याच एका मुलाखतीत धक्कादायक अनुभव सांगितला आहे.
Daisy Shah
तिच्या मते, कन्नड सिनेमात अभिनेत्रीच्या नाभीवर विशेष फोकस केला जातो.
डेझीच्या मते, अनेक गाण्यांमध्ये अभिनेत्रीच्या नाभीवर फळं, भाज्या किंवा बर्फ ठेवून क्लोज-अप शॉट्स घेतले जायचे!
डेझीने थेट कोणाचेही नाव घेतले नसले तरी, अनेकांचा रोख अभिनेते-दिग्दर्शक व्ही. रविचंद्रन यांच्याकडे आहे, जे अशा दृश्यांसाठी ओळखले जातात.
Daisy Shah
डेझीच्या खुलाशानंतर नेटकऱ्यांनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने तर रविचंद्रन यांना गंमतीने 'चीफ नेव्हल ऑफिसर' असेही म्हटले आहे.
Daisy Shah
फक्त डेझीच नाही, तर यापूर्वी अभिनेत्री मालविका मोहननने देखील दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील या 'नाभी' वेडावर आश्चर्य व्यक्त केलं होतं.
Daisy Shah
"मी मुंबईत वाढल्यामुळे नाभीबद्दल इतकं वेड असणं, ही माझ्यासाठी पूर्णपणे नवीन गोष्ट होती," असं मालविका म्हणाली होती. तिने या ट्रेंडला 'विचित्र' म्हटले होते.
Daisy Shah
तिने असेही नमूद केले की, सोशल मीडियावर अभिनेत्रींचे फोटो अनेकदा त्यांच्या शरीरावर झूम करून दाखवले जातात, यावरून 'नाभी'चे वेड किती खरे आहे हे दिसून येते.
Daisy Shah
अभिनेत्री डेझी शाहच्या या वक्तव्यामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अशा अनेक प्रथांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.