Anirudha Sankpal
आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांशी फोनवरून झालेला संवाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
या व्हिडिओत अजित पवारांशी असहमती दर्शवणाऱ्या या तरूण महिला अधिकाऱ्याची सध्या महाराष्ट्रातच नाही तर देशभरात चर्चा आहे.
या आयपीएस अंजना कृष्णा यांचं पूर्ण नाव हे अंजली कृष्णा व्ही एस असं आहे. त्या सध्या करमाळ्यात डीएसपी म्हणून कार्यरत आहेत.
अंजना कृष्णा या २०२२ आयपीएस बॅचच्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा युपीएससीमध्ये ऑल इंडिया रँक ३५५ आला होता.
अंजना कृष्णा या मुळच्या केरळच्या आहेत. त्यांचा जन्म तिरूवअनंतपुरूम इथं झाला. त्यांचे वडील हे कपड्याचे व्यापारी आहेत.
अंजना कृष्णा यांची आई या स्थानिक कोर्टात टायपिस्टची नोकरी करत होत्या. अंजली या सामान्य कुटुंबातून येतात.
अंजना कृष्णा यांनी गणित विषयातून बीएसी केलं आहे. त्यानंतर त्यांनी युपीएससीची परीक्षा दिली अन् आयपीएस अधिकारी