Anirudha Sankpal
भारतीय क्रिकेट संघानं आशिया कप तब्बल ७ वेळा जिंकत आपला दबदबा निर्माण केलाय.
आशिया कपच्या फायनलमध्ये दमदार कामगिरी करून कोणी कोणी सामनावीराचा पुरस्कार पटकावला हे पाहुयात.
१९८४ : ही आशिया कपची फायनल भारतानं जिंकली होती. त्यावेळी सुरिंदर खन्ना यांनी ५६ धावा करत दोन स्टम्पिंग देखील केले होते. त्यांना सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.
१९८८ मध्ये भारतानं आशिया कपची फायनल जिंकली होती. त्यावेळी सामनावीर ठरलेल्या नवज्योतसिंग सिद्धूनं ७६ धावांची खेळी केली होती.
१९९० -९१ च्या आशिया कपच्या फायनलमध्ये सामनावीर मोहम्मद अझहरूद्दीननं ५४ धावांची नाबाद खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता.
१९९५ : मोहम्मद अझहरूद्दीनने आशिया कपच्या फायनलमध्ये नाबाद ९० धावा करून सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता.
२०१० च्या आशिया कपमध्ये दिनेश कार्तिकनं ६६ धावांची खेळी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. याचबरोबर भारतानं आशिया कपवर आपलं नाव कोरलं.
२०२३ : आशिया कपच्या फायलन सामन्यात मोहम्मद सिराजनं भेदक मारा करत २१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. सहाजिकच तो सामनावीर ठरला.