Rahul Shelke
पतंगाला खूप जुना इतिहास आहे. जाणून घेऊया पतंगाची सुरुवात कुठे झाली.
पतंगाचा शोध नेमका कधी आणि कुणी लागला हे स्पष्ट नाही. पण बहुतेक इतिहासकार मानतात की पतंगांचा उगम चीनमध्ये झाला.
काही पुराव्यांनुसार इ.स.पू. 200 च्या आसपास चीनमध्ये पतंग उडवण्याचा पहिला लिखित उल्लेख आढळतो.
चीनच्या हान राजवटीतील जनरल हान ह्सिन यांनी शहराच्या भिंतीवर पतंग उडवून भुयारी मार्ग किती लांब खोदावा लागेल हे मोजलं.
इ.स.पू. 450 मध्ये मो-स्टे्स नावाच्या तत्त्वज्ञाने लाकडी पक्षी बनवला होता. काही लोक त्यालाच पहिला पतंग मानतात.
13व्या शतकापर्यंत व्यापाऱ्यांमुळे पतंग चीनमधून कोरिया, मग भारत, आणि मध्य पूर्व येथे पोहोचला. प्रत्येक देशाने पतंगाला स्वतःची वेगळी ओळख दिली.
भारतामध्ये पतंग उडवणं विशेषतः मकरसंक्रांतीशी जोडलेलं आहे.
गुजरात आणि राजस्थानमध्ये पतंग उडवणं फक्त खेळ नाही तर स्पर्धा आणि उत्सव बनला.
13व्या शतकात मार्को पोलो यांनी पतंगाचं वर्णन केलं. 14-15व्या शतकात पतंग युरोपमध्ये पोहोचला. आणि पुढे जगभरात तो लोकप्रिय झाला.