Rahul Shelke
कधी वजन झटपट कमी होतं आणि काही दिवसांनी पुन्हा वाढतं. यालाच Yo-Yo Dieting म्हणतात.
Yo-Yo मध्ये वजन वारंवार कमी-जास्त होतं. हे धोकादायक ठरू शकतं.
स्ट्रिक्ट डाएट/क्रॅश डाएट केल्यावर वजन पटकन कमी होतं. डाएट सोडलं की पुन्हा वजन वाढतं. पुन्हा डाएट… पुन्हा तीच सायकल सुरु होते.
क्रॅश डाएटमुळे फक्त चरबी नाही, तर मसल्स (स्नायू) पण कमी होतात आणि शरीर कमकुवत होऊ शकतं.
शरीराला वाटतं “अन्न कमी मिळतंय” म्हणून ते ऊर्जा वाचवतं… आणि मेटाबॉलिझम कमी होतो.
मेटाबॉलिझम स्लो झाल्यावर थोडंसं जरी जास्त खाल्लं, तरी वजन पटकन वाढायला लागतं.
Yo-Yo Dietingमुळे शरीरात चरबी वाढू शकते.
सतत वजन कमी-जास्त झाल्यावर बेली फॅट (पोटाची चरबी) वाढण्याची शक्यता असते आणि शरीराचा आकारही बदलू शकतो.
वारंवार Yo-Yo Dieting केल्याने हृदयविकार, BP, शुगर/डायबिटीजसारखे आजार वाढू शकतात.