पुढारी वृत्तसेवा
एअर कूलर एका दिवसात किंवा एका व्यक्तीमुळे तयार झाला नाही. हा हजारो वर्षांचा प्रवास आहे.
प्राचीन इजिप्तमध्ये लोक ओल्या गवताच्या चटया आणि पाण्याने भरलेल्या मडक्यांनी हवा थंड करत. भारतामध्येही खस-गवताच्या पडद्यांवर पाणी शिंपडून घरात गारवा निर्माण केला जायचा.
पाणी वाफ होताना उष्णता शोषून घेतं. याचं बाष्पीभवन शीतकरण (Evaporative Cooling) तत्त्वावर आजचे एअर कूलर चालतात.
१६व्या शतकात लिओनार्डो दा विंची यांनी पाण्याच्या चाकांद्वारे हवा थंड करणाऱ्या यंत्राची संकल्पना मांडली. त्या काळात प्रत्यक्ष उत्पादन शक्य नव्हतं, पण बीज रोवली गेली.
१९५१ मध्ये अमेरिकेतील संशोधक रिचर्ड सी. लारामी यांनी पहिल्या पोर्टेबल आइस चेस्ट कूलर साठी पेटंट घेतलं. हा कूलर अन्न आणि पेये थंड ठेवण्यासाठी वापरला जायचा.
यानंतर कोलमन कंपनीने कूलर मोठ्या प्रमाणावर बाजारात आणले.
१९८८ मध्ये सिम्फनी लिमिटेड या कंपनीने भारतात घरगुती एअर कूलरला नवे रूप दिले. तेव्हापासून मध्यमवर्गीय घरांमध्ये कूलर पोहोचला.
आजचे कूलर इन्व्हर्टर सपोर्ट, हनीकॉम्ब पॅड, आयनायझर, रिमोट कंट्रोल अशा आधुनिक फीचर्ससह येतात.