Rahul Shelke
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच EVM. भारतामध्ये निवडणुका पारदर्शक, सुरक्षित आणि वेगवान व्हाव्यात यासाठी या यंत्राचा वापर केला जातो.
नाही. भारतामध्ये EVM हा एकट्या व्यक्तीचा शोध नाही, तर अनेक तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हे मशीन तयार केलं आहे.
EVM विकसित करण्याचं नेतृत्व Election Commission of India (भारतीय निवडणूक आयोग) ने केलं. निवडणूक प्रक्रियेत होणारे गैरप्रकार थांबवणं हा मुख्य उद्देश होता.
1980 मध्ये भारतात पहिली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा तयार झाली. ही मशीन सार्वजनिकरित्या वेगवेगळ्या शहरांत दाखवण्यात आली.
एम. बी. हनीफा यांना भारतातील पहिली मतदान यंत्रणा तयार केल्याचं श्रेय दिलं जातं. त्यांनी 1980 मध्ये प्राथमिक स्वरूपाचं मशीन सादर केलं.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मधील संशोधन विभागाने मशीनच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली.
IIT बॉम्बेच्या Industrial Design Centre ने मशीन मजबूत, टिकाऊ बनवली. यामध्ये प्रो. ए. जी. राव यांचं योगदान महत्त्वाचं होतं.
EVM तयार करण्यासाठी दोन सरकारी कंपन्या सहभागी होत्या. एक भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) बंगळुरू आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL), हैदराबाद
1982 मध्ये केरळमधील परावूर विधानसभा मतदारसंघात EVM चा पहिल्यांदा वापर करण्यात आला.
बॅलेट पेपर लुटणे, बूथ कॅप्चरिंग, वेळ आणि खर्च वाचवणे, या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून EVM आणण्याचं सरकारणं ठरवलं.