ऋतु बदलतोय? आरोग्याची 'अशी' घ्या काळजी

पुढारी वृत्तसेवा

पाण्याचे योग्य प्रमाण: ऋतू कोणताही असो, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.

आहारावर नियंत्रण: बाहेरील उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे आणि नेहमी ताजे, गरम व सकस अन्न खाण्यावर भर द्यावा.

फळांचे सेवन: शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात हंगामी फळांचा आणि पालेभाज्यांचा समावेश करावा.

पुरेशी विश्रांती: बदलत्या वातावरणामुळे शरीराला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे दररोज किमान ७ ते ८ तास शांत झोप घ्यावी.

कपड्यांची निवड: वातावरणातील बदलानुसार कपड्यांची निवड करावी; उदा. थंडीत उबदार कपडे तर उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत.

व्यायाम आणि योग: शरीर लवचिक आणि निरोगी ठेवण्यासाठी दररोज किमान ३० मिनिटे हलका व्यायाम किंवा योगासने करावीत.

आजाराकडे दुर्लक्ष नको: सर्दी, खोकला किंवा ताप यांसारखी लक्षणे दिसल्यास घरगुती उपायांसोबतच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

येथे क्लिक करा...