तुम्ही वापरता त्या Canva चा शोध कोणी लावला माहितेय का?

पुढारी वृत्तसेवा

2006 मध्ये कल्पना सुचली

जगभरातील डिझाइन क्षेत्र बदलणाऱ्या Canva च्या मागे आहे एका तरुणीची जिद्द.

Canva Success Story | Pudhari

कोण आहे मेलानी पर्किन्स?

ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरातील एक तरुण उद्योजिका. जिच्या डोक्यात आली एक साधी कल्पना.. “डिझाइन सगळ्यांसाठी सोपं असायला हवं!”

Canva Success Story | Pudhari

समस्या काय होती?

पर्किन्स विद्यार्थ्यांना डिझाइन सॉफ्टवेअर शिकवत होती. फोटोशॉप सारखी क्लिष्ट टूल्स वापरताना विद्यार्थ्यांची होणारी कसरत तिला दिसत होती.

Canva Success Story | Pudhari

इथूनच जन्म झाला Canva चा!

“जर डिझाइन इतकं कठीण वाटत असेल, तर आपण ते सगळ्यांसाठी सोपं का करू नये?” हीच Canva मागची मूळ कल्पना होती.

Canva Success Story | Pudhari

पहिला प्रयत्न: Fusion Books

Canva आधी पर्किन्स आणि क्लिफ ओब्रेक्ट यांनी ऑनलाइन इयरबुक डिझाइन करणारी ‘Fusion Books’ कंपनी सुरू केली. ही Canva ची पायाभरणी होती.

Canva Success Story | Pudhari

100 वेळा नकार… पण हार मानली नाही

पर्किन्सला गुंतवणूकदारांकडून 100 पेक्षा जास्त वेळा नकार मिळाला. पण तिने जिद्द सोडली नाही.

Canva Success Story | Pudhari

2013: Canva ची अधिकृत सुरुवात

मेलानी पर्किन्स, क्लिफ ओब्रेक्ट आणि कॅमेरॉन ॲडम्स या तिघांनी मिळून Canva लाँच केलं.

Canva Success Story | Pudhari

सोपं, वेगवान आणि मोफत डिझाइन

Canva मुळे आता पोस्टर, प्रेझेंटेशन, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ हे सगळं काही मिनिटांत तयार होतं.

Canva Success Story | Pudhari

अब्जावधी डॉलरची कंपनी

2013 मध्ये सुरू झालेली Canva 2025 पर्यंत 42 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्याची कंपनी बनली. एक कल्पनेने जगभरात क्रांती केली.

Canva Success Story | Pudhari

उन्हाळ्यात गार हवा देणाऱ्या कूलरचा शोध कसा लागला? कोणी लावला?

Air Cooler | Pudhari
येथे क्लिक करा