Rahul Shelke
आज महाराष्ट्रात अजित पवार म्हणजे “दादा”. पण हा शब्द त्यांच्या नावाला कधी आणि कसा जोडला गेला, हे फार कमी लोकांना माहिती आहे.
सुरुवातीला अजित पवार हे फक्त एक तरुण आमदार म्हणून ओळखले जायचे. राजकारणात त्यांची वाटचाल सुरू असतानाच त्यांच्या नावासोबत “दादा” हा शब्द जोडला गेला.
हा शब्द सर्वात आधी वापरला होता सुधाकरराव नाईक यांनी. ते महाराष्ट्राचे 11 वे मुख्यमंत्री होते आणि अजित पवार त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.
सुधाकरराव नाईक अजित पवारांना प्रेमाने “दादा” म्हणायचे. मुख्यमंत्रीच जर “दादा” म्हणत असतील, तर हळूहळू सगळ्यांनी तोच शब्द वापरायला सुरुवात केली.
1990 नंतर अजित पवार “दादा” म्हणून ओळखले जाऊ लागले. कार्यकर्ते, अधिकारी, गावकरी सगळ्यांच्या तोंडी एकच नाव.. “दादा”.
अजित पवारांना राजकारणात आणण्याचं श्रेय जातं शरद पवार यांना जातं. त्यांनीच अजित पवारांना आमदार केलं.
अजित पवारांना ग्रामीण भागातील प्रश्नांची चांगली जाण होती. पाणी, रस्ते, रोजगार, शेतकऱ्यांचे आणि सामान्य माणसांचे प्रश्न त्यांना माहीत होते.
कामातला वेग, थेट बोलणं आणि निर्णयक्षमता यामुळे अजित पवार वेगळे ठरले. “दादा” हे नाव हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशीच जोडलं गेलं.
सुधाकरराव नाईक यांच्यामुळे महाराष्ट्राला दादा मिळाले.