अंजली राऊत
एक ग्लास गरम पाण्यामध्ये 3 चमचे साखर आणि 1/4 चमचे मीठ टाका. जेव्हा पाणी उकळू लागेल तेव्हा गॅस बंद करा आणि कॉफी मग मध्ये गाळून घ्या. आता हे पाणी घोट घोटभर चहा सारखे प्या.
2 चमचे एलोवेरा जेल आणि 2 चमचे गुलाबजल घ्या. दोन्ही गोष्टी मिक्स करून आईस ट्रे मध्ये रात्रीच्या वेळी फ्रीज होण्यासाठी ठेवून द्या. जेणेकरून सकाळी उठल्यावर तुम्ही याचा वापर करू शकतात
ग्रीन टी बनवा आणि थंड झाल्यावर आईस ट्रे मध्ये भरून फ्रीजर मध्ये ठेवून द्या. सकाळी एक आईस क्यूब घेऊन तो हलका हलका चेहऱ्यावर चोळा. त्वचेवर आईस क्यूब लावण्याची योग्य पद्धत अशी असते की तुम्ही कोणत्या तरी सुती रुमाला मध्ये लपेटून नंतर त्वचेवर आईस क्यूब लावावे.
बदाम तेलाचे 4 ते 5 थेंब घेऊन चेहऱ्यावर आणि मानेवर 5 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. हा मसाज करण्याआधी चेहरा ताज्या पाण्याने स्वच्छ करा, जर त्वचा चिपचीपीत वाटत असेल तर तुम्ही फेसवॉशचा वापर करा, त्यानंतर बदामच्या तेलाने मसाज करा.
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मधुमेह असेल तर मॉर्निंग ड्रिंकमध्ये Without sugar ग्रीन टी किंवा ब्लॅक टी प्या. तज्ज्ञांचा सल्ला घ्या.