Green vs Black Tea | दूधयुक्त, ब्लॅक टी, ग्रीन टी: आरोग्यासाठी कोणता चहा उत्तम?

अविनाश सुतार

दूधयुक्त, ब्लॅक टी, ग्रीन टी हे तिन्ही प्रकारचे चहा एकाच वनस्पतीपासून मिळतात, पण तयार करण्याच्या पद्धतीनुसार त्यांचे गुणधर्म बदलतात

'द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, चहामधील फ्लॅव्होनॉइड्समुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते

दुधामुळे चहामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि चरबी (fats) समाविष्ट होतात, ज्यामुळे तो केवळ एक पेय न राहता हलक्या आहारासारखा काम करतो

ज्यांना भूक कमी लागते किंवा ज्यांना अतिरिक्त कॅलरीजची गरज असते, त्यांच्यासाठी हा चहा उपयुक्त ठरू शकतो

रोजच्या वापरासाठी साखर कमी असलेला आणि मर्यादित प्रमाणात घेतलेला दूधयुक्त चहा चांगला असतो

ब्लॅक टी दूधयुक्त चहापेक्षा हलका असतो. या चहामुळे रक्तवाहिन्यांचे कार्य आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते

यातील कॅफिन हळूहळू ऊर्जा देते, ज्यामुळे एकदम थकवा जाणवत नाही. साखर आणि दुधशिवाय घेतल्यास यात कॅलरीज अतिशय कमी असतात

आरोग्याचा विचार करता ग्रीन टी आघाडीवर आहे. याच्या पानांवर फार कमी प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे त्यातील नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स टिकून राहतात

दीर्घकालीन आरोग्य आणि शरीराचे चयापचय संतुलित राखण्यासाठी ग्रीन टी हा रोजच्या वापरासाठी सर्वोत्तम पर्याय आहे

येथे क्लिक करा