पुढारी वृत्तसेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील पहिला पुतळा भारतातच उभारला गेला आणि तेही त्यांच्या हयातीत.
हा ऐतिहासिक पुतळा कोल्हापूरमध्ये भाई माधवराव बागल यांनी उभारला. पुतळा उभारण्याची कल्पना गंगाराम कांबळे यांनी सुचवली होती.
ठिकाण होतं बिंदू चौक, कोल्हापूर, आजही हे ठिकाण ऐतिहासिक मानलं जातं
9 डिसेंबर 1950 हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला
या पुतळ्याचे शिल्पकार होते बाळ चव्हाण त्यांनी अत्यंत सुंदर आणि प्रभावी शिल्प तयार केलं
यामुळे कोल्हापूर शहराला एक खास मान मिळालं. जगातील पहिला आंबेडकर पुतळा उभारणारे शहर म्हणून ते ओळखले जाऊ लागले.
हा पुतळा फक्त शिल्प नाही, तर सामाजिक क्रांतीची आणि समतेच्या लढ्याची प्रेरणा आहे
आजही बिंदू चौकात उभा असलेला हा पुतळा आपल्याला शिक्षण, समता आणि संघर्षाची प्रेरणा देतो.