पुढारी वृत्तसेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला समाजबदलाचं सर्वात मोठं शस्त्र मानलं.
1945 मध्ये त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. यातून गरीब आणि वंचितांसाठी शिक्षणाची दारं उघडली.
त्यांचा उद्देश स्पष्ट होता दलित, शोषित आणि मागासवर्गीय समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं.
1946 मध्ये मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना झाली. हे त्यांच्या शिक्षण चळवळीचं पहिलं मोठं पाऊल होतं.
या कॉलेजमुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली. ही केवळ संस्था नव्हती, तर एक सामाजिक क्रांती होती.
1950 मध्ये औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालय सुरू करण्यात आलं. यामुळे मराठवाड्यात शिक्षणाची नवी दारं उघडली.
ही संस्थानं म्हणजे स्वतःचं आयुष्य बदलण्याची संधी होती.
या संस्थांमुळे हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपलं आयुष्य बदललं. आज अनेक यशस्वी व्यक्ती याच संस्थांमधून घडल्या.
आज महाराष्ट्रात आणि देशभरात अनेक शैक्षणिक संस्थांना डॉ. आंबेडकरांचं नाव देण्यात आलं आहे.
डॉ. आंबेडकरांनी सांगितलं होतं “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” आणि याची सुरुवात त्यांनी शिक्षणातूनच केली.