पुढारी वृत्तसेवा
अरबी समुद्रातील अजिंक्य किल्ला!
मुरुड-जंजिरा किल्ला कोणी बांधला? त्याचा इतिहास आणि रहस्य जाणून घ्या.
कुठे आहे मुरुड-जंजिरा?
रायगड जिल्ह्यातील मुरुड किनाऱ्यापासून समुद्रात असलेला हा जलदुर्ग मुंबईपासून सुमारे 165 किमी अंतरावर आहे.
कोणी बांधला हा किल्ला?
सुरुवातीला स्थानिक कोळी समाजाने समुद्री चाच्यांपासून संरक्षणासाठी येथे लाकडी किल्ला उभारला होता.
दगडी किल्ल्यात रूपांतर कसं झालं?
सन 1567 मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीतील मलिक अंबरने लाकडी किल्ल्याऐवजी मजबूत दगडी किल्ला उभारला.
'अजिंक्य जंजिरा' का म्हणतात?
मराठे, मोगल, पोर्तुगीज आणि इंग्रजांनी अनेक हल्ले केले, पण हा किल्ला कधीच जिंकता आला नाही.
समुद्रात उभा असलेला अभेद्य जलदुर्ग
समुद्राच्या मध्यभागी, उंच तटबंदी आणि मजबूत बांधकामामुळे हा किल्ला शत्रूंसाठी कायम अभेद्य ठरला. बांधकाम करताना वाळू, चुनखडी, गूळ आणि वितळलेलं शिसं वापरलं होतं.
व्यापारासाठीही महत्त्वाचा
गुजरात ते मंगळुरू सागरी मार्गावरील हा महत्त्वाचा व्यापार आणि नौदल तळ मानला जात होता.
कोणता व्यापार व्हायचा?
हत्तीचे सुळे, सोने, रेशीम, घोडे आणि इतर मौल्यवान वस्तूंचा व्यापार या परिसरातून होत असे.
आजही पर्यटकांची पहिली पसंती
भव्य तटबंदी, अथांग समुद्र आणि इतिहासाची साक्ष देणारा हा किल्ला दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करतो.
शौर्य, रणनीती आणि इतिहासाचा अभिमान!
मुरुड-जंजिरा हा फक्त किल्ला नाही, तर महाराष्ट्राच्या सागरी वैभवाचा आणि अभेद्य इतिहासाचा जिवंत पुरावा आहे.