पुढारी वृत्तसेवा
आरोग्याच्या दृष्टीने दात पूर्णपणे “पांढरे शुभ्र” असणे म्हणजेच ते जास्त निरोगी आहेत, हा गैरसमज आहे
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते नैसर्गिकरित्या थोडे फिकट पिवळसर (ivory shade) दात अधिक सामान्य आणि निरोगी मानले जातात
दात तीन थरांचे बनलेले असतात, Enamel (बाहेरील थर) – पांढरट व पारदर्शक, Dentin (मधला थर) – किंचित पिवळसर, Pulp (आतील भाग) – मज्जातंतू व रक्तपुरवठा
Enamel पारदर्शक असल्यामुळे आतल्या Dentin चा पिवळसर रंग किंचित दिसतो. त्यामुळे नैसर्गिक दात पूर्णपणे शुभ्र नसतात
नैसर्गिक फिकट पिवळसर दातांवर मजबूत Enamel असतो, Dentin निरोगी असतो, संवेदनशीलता कमी असते
अतिशय शुभ्र (कृत्रिम पांढरे) दात जास्त Bleaching केल्यास Enamel पातळ होऊ शकतो, दात संवेदनशील होऊ शकतात
नैसर्गिक फिकट पिवळसर दात हे आरोग्यदृष्ट्या अधिक निरोगी मानले जातात. दुधासारखे पांढरे शुभ्र दात हे नेहमीच निरोगी असतीलच असे नाही
दात मजबूत, किड नसलेले आणि हिरड्या निरोगी असणे आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचे असते
चहा, कॉफी, तंबाखू सेवन, स्वच्छतेचा अभाव, वय वाढणे, काही औषधांचा परिणाम झाल्याने दात पिवळे किंवा तपकिरी दिसू लागतात. यावर उपचार करून घेणे आवश्यक असते