पुढारी वृत्तसेवा
दारूची बाटली उघडल्यानंतर ती किती दिवस टिकते हे दारूच्या प्रकारावर, साठवण्याच्या पद्धतीवर आणि हवेशी संपर्क किती झाला आहे यावर अवलंबून असते
हार्ड लिकरचे झाकण काढल्यानंतर दारू साधारण 1 ते 2 वर्षे टिकते, अल्कोहोलचे प्रमाण 35 ते 45 टक्के असल्याने बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत
रेड वाइन 3 ते 5 दिवस आणि व्हाइट वाइन 3 ते 5 दिवस फ्रिजमध्ये टिकू शकते स्पार्कलिंग वाइन 1 ते 3 दिवस पिण्यास योग्य असते
बिअरच्या बाटलीचे झाकण उघडल्यानंतर 1 दिवसाच्या आत संपवणे योग्य ठरते. कारण कार्बोनेशन (गॅस) निघून गेल्याने चव बदलते आणि फ्लॅट होते
क्रीम लिकरच्या (Cream Liqueur) बाटलीचे झाकण उघडल्यानंतर साधारण 6 महिन्यापर्यंत फ्रिजमध्ये ठेवल्यास चांगली राहू शकते
वाइनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण 8 ते 15 % असल्याने ऑक्सिडेशन लवकर होते, त्यामुळे वाइनची चव, सुगंध आणि रंग बदलतो. त्यामुळे कॉर्क, झाकण लावून फ्रिजमध्ये ठेवा, एअर-टाइट स्टॉपर वापरल्यास वाईन जास्त टिकते
दारूच्या बाटलीचे झाकण काढल्यानंतर हवेशी संपर्क आल्याने हळूहळू दारूची चव बदलू शकते बाटली कमी भरलेली असल्यास ऑक्सिडेशन होऊन चव बदलते
दारू अधिक दिवस टिकण्यासाठी झाकण घट्ट बंद ठेवा, बाटली थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा, थंड आणि कोरड्या जागी ठेवा
दारू खराब झाली आहे हे कसे ओळखावे? वास आंबट किंवा विचित्र येणे, रंग बदलणे, चव कडू, आंबट लागणे, क्रीम लिकरमध्ये गुठळ्या दिसणे
टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून, ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. संबंधित मजकूर केवळ माहितीसाठी आहे. मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे. आम्ही मद्यपानाचे समर्थन करत नाही.