White vs Black Sesame: हिवाळ्यात आहारात पांढरे तीळ खाणे फायदेशीर की काळे तीळ?

Anirudha Sankpal

हिवाळ्यात आहारात आवर्जून समाविष्ट केले जाणारे तीळ हे हेल्दी फॅट्स, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि आयर्न यांसारख्या खनिजांनी समृद्ध असतात.

Winter sesame seeds benefits

पांढऱ्या तिळावरील काळे आवरण काढून टाकले जात असल्याने, त्यातील खनिजांचे प्रमाण कमी होते पण कॅल्शियमची बायो-अवेलेबिलिटी वाढते.

Sesame seeds benefits

पांढरे तीळ हाडे मजबूत करण्यासाठी, चाळीशीनंतरच्या महिलांमधील हार्मोनल बदलांवर आणि त्वचा-सांध्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात.

Sesame Oil: तीळाच्या तेलाचे अनोखे फायदे | canva

पचनास हलके असणारे पांढरे तीळ चटणी, लाडू, सॅलड किंवा ताहिनीच्या स्वरूपात रोजच्या आहारात सहज समाविष्ट करता येतात.

Sesame seeds | pudhari photo

काळे तीळ त्यांच्या अंगावरील नैसर्गिक टरफलासह खाल्ले जातात, ज्यामुळे त्यात अँटीऑक्सिडंट्स, आयर्न, झिंक आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.

काळे तीळ थायरॉइडची कार्यप्रणाली सुधारणे, हिमोग्लोबिन वाढवणे, केस गळणे थांबवणे आणि शरीराची ऊर्जा वाढवण्यास मदत करतात.

शरीरात आयर्नची कमतरता किंवा थकवा असल्यास काळे तीळ उत्तम पर्याय आहेत, तर कॅल्शियम आणि हाडांच्या आरोग्यासाठी पांढरे तीळ अधिक फायदेशीर ठरतात.

उत्तम आरोग्यासाठी हे दोन्ही प्रकार बदलून-बदलून वापरता येतात, मात्र रोजच्या आहारात १ ते २ चमचे तीळच खावेत.

येथे क्लिक करा