Eggshells Fertilizer: अंड्याच्या टरफलापासून 'असे' बनवा तुमच्या घरच्या बागेसाठी उत्तम सेंद्रीय खत

Anirudha Sankpal

अंड्याची टरफले कॅल्शियम कार्बोनेटने समृद्ध असतात, जी फेकून न देता रोपांच्या चांगल्या वाढीसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणून वापरता येतात.

टरफले थेट मातीत न टाकता सिरक्यात (Vinegar) मिसळून लिक्विड खत बनवल्यास रोपांना कॅल्शियम सहज शोषून घेणे शक्य होते.

खत बनवण्यासाठी ५ ते ६ अंड्यांची स्वच्छ व वाळलेली टरफले बारीक मोडून एका काचेच्या बरणीत ठेवावीत.

बरणीतील टरफले पूर्णपणे बुडतील एवढे सिरका त्यात घालावा; सिरका घालताच बुडबुडे आणि फेस येणे ही एक सामान्य रासायनिक प्रक्रिया आहे.

हे मिश्रण ४८ तास (२ दिवस) तसेच ठेवल्यास टरफलांमधील कॅल्शियम द्रव रूपात सिरक्यात विरघळते.

२ दिवसांनंतर हे लिक्विड चाळणीने व्यवस्थित गाळून घ्यावे आणि वापरण्यापूर्वी पाण्यात मिसळून पातळ करणे अत्यंत आवश्यक आहे.

१ लिटर पाण्यात सुमारे ५ मिली लिक्विड मिसळून हे द्रावण रोपांच्या मातीत टाकावे; मोठे झालेले फुलझाडे आणि फळझाडांसाठी हे फायदेशीर ठरते.

केवळ हे खत न देता रोपांच्या पूर्ण वाढीसाठी योग्य सूर्यप्रकाश, पाणी, चांगली माती आणि इतर पोषक घटकांचीही तितकीच गरज असते.

येथे क्लिक करा