मोनिका क्षीरसागर
तारुण्यात केस पांढरे होणे ही सध्याची एक सामान्य समस्या बनली आहे.
अकाली केस पांढरे होणे: सध्याच्या धावपळीच्या जीवनात आणि चुकीच्या आहारामुळे तारुण्यातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.
व्हिटॅमिन B12 ची कमतरता: शरीरात व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे केसांमधील 'मेलेनिन' कमी होते, परिणामी केस पांढरे होऊ लागतात.
इतर महत्त्वाची जीवनसत्त्वे: केवळ B12 च नाही, तर व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन E आणि बायोटिनच्या कमतरतेमुळेही केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
खनिजांची भूमिका: लोहाची (Iron) आणि तांब्याची (Copper) कमतरता असल्यास केसांचा नैसर्गिक काळा रंग फिका पडू लागतो.
आहारात करा बदल: केस पुन्हा काळे आणि निरोगी करण्यासाठी आहारात अंडी, दूध, पालेभाज्या, सुका मेवा आणि मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा.
तणाव कमी करा: अतिप्रमाणात मानसिक ताण घेतल्याने शरीरातील पोषक तत्वांवर परिणाम होतो, ज्याचा थेट परिणाम केसांवर दिसून येतो.
नैसर्गिक उपाय: रासायनिक शॅम्पूऐवजी आवळा, शिकाकाई आणि कढीपत्त्याचा वापर केल्यास केसांचे पोषण वाढते.
तज्ज्ञांचा सल्ला: जर केस झपाट्याने पांढरे होत असतील, तर रक्ताची चाचणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक सप्लिमेंट्स घेणे फायदेशीर ठरते.