अंजली राऊत
वॉशिंग मशीन हे एक असे उपकरण आहे जे कपडे धुणे सोपे करते. परंतु ते आता एक गरज मानले जात असल्याने जवळजवळ प्रत्येक घरात आढळून येत आहे
एक काळ असा होता जेव्हा प्रत्येक घरात सेमी ॲटोमेटीक मशीन आढळत होत्या. गेल्या काही वर्षांत, फुली ऑटोमॅटिक मशीनला ग्राहकांमध्ये चांगली पसंती मिळत आहे. पण यामध्ये देखील कोणता पर्याय योग्य आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे.
जर तुमच्याकडे कमी पाणी असेल किंवा पाण्याची उपलब्धता मर्यादित असेल, तर सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन हा एक चांगला पर्याय आहे. कारण फुली ऑटोमॅटिक मशीनसाठी जास्त पाणी वापरले जाते.
फुली ऑटोमॅटिक मशीन स्केल बिल्डअपसाठी अधिक संवेदनशील मानली जातात. म्हणूनच, हार्ड वॉटर पाणी उपलब्ध असलेल्या घरांसाठी मी-ऑटोमॅटिक मशीन हा एक चांगला पर्याय आहे, कारण हार्ड वॉटर प्रकारच्या पाण्याच्या परिणामांना तुलनेने अधिक प्रमाणात काम करु शकते
फुली ऑटोमॅटिक मशीनसाठी काही विशेष प्लंबिंगचे खास ॲडजेस्टमेंटची आवश्यकता असते. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि तिथे जर अशी ॲडजेस्टमेंट करता येत नसेल तर सेमी-ऑटोमॅटिक मशीन हाच पर्याय निवडावा लागेल
जर तुम्हाला जागेच्या अडचणी असलेल्या वातावरणात रहावे लागत असेल, तर फुली ऑटोमॅटिक मशीन हा एक चांगला पर्याय आहे. त्याची कॉम्पॅक्ट डिझाइन आणि सिंगल ड्रममुळे ते लहान जागेतही चालवणे अगदी सोपे होते.
जर तुमचे कुटुंब मोठे असेल तर फुली ऑटोमॅटिक मशीनच निवडा. कारण मोठ्या ड्रममध्ये एकाच वेळी अनेक कपडे धुण्याची सोय असते, ज्यामुळे कपडे सुकविण्यासाठी दुसऱ्या ड्रममध्ये वारंवार हलवण्याचा त्रास कमी होतो.छोटी कुटुंबे सेमी-ऑटोमॅटिक मशीन पसंत करू शकतात.
जर तुम्हाला तुमचे वीज बिल कमी ठेवायचे असेल, तर सेमी-ऑटोमॅटिक मशीन चांगला पर्याय निवडा, कारण आधुनिक वैशिष्ट्यांमुळे, फुली ऑटोमॅटिक मशीन जास्त वीज खेचून घेते, ज्यामुळे तुमचे वीज बिल तुलनेने जास्त येण्याची शक्यता नाकारता येत नाही
बाजारभावानुसार फुली ऑटोमॅटिक मशीन या सेमी-ऑटोमॅटिक मशीनपेक्षा खूप महाग असतात. त्यामुळे सोशल मीडिया ट्रेंड्सना बळी पडू नका. तुमच्या बजेटला काय परवडू शकेल याचा विचार करुन त्यानंतरच योग्य तो पर्याय निवडा.