तुम्‍हाला सतत झोप येतीय? 'या' जीवनसत्त्‍वांची कमतरता असू शकते, जाणून घ्‍या उपाय

पुढारी वृत्तसेवा

शांत झोप शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे; पण जास्त झोप येणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Canva

व्हिटॅमिन B12 ला ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत मानले जाते, जे रक्तातील लाल रक्तपेशींच्या (Red Blood Cells) निर्मितीमध्ये मदत करते. त्याच्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो आणि जास्त झोप येते.

Canva

व्हिटॅमिन बी12 ची कमतरता दूर करण्यासाठी दूध, दही, अंडी, मासे आणि पनीर खाण्याचा सल्ला दिला जातो.

Canva

आयर्न (लोह) कमतरतेमुळे मेंदू आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे थकवा येतो आणि जास्त झोप येते.

Canva

आयर्न (लोह) कमतरता कमी करण्‍यासाठी आहारात पालेभाज्या, पालक, बीन्स, मटण आणि मसूरच्या डाळीचा समावेश करावा.

Canva

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे देखील थकवा आणि जास्त झोप येते.

Canva

व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी सकाळच्या उन्हात वेळी थाेडावेळ बसावे.

Canva

दूध, दही, मशरूम, मासे आणि अंड्यांमध्ये चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन डी आढळते.

Canva

जास्त झोपेचे कारण शरीरातील मॅग्नेशियमची कमतरता देखील असू शकते.

Canva

मॅग्नेशियम युक्त पदार्थ मॅग्नेशियमची कमतरता दूर करण्यासाठी बदाम, पालक, भोपळ्याच्या बिया, केळी आणि काजू खाण्याचा सल्ला दिला जातो.

Canva
येथे क्‍लिक करा.