डिहायड्रेशन आणि तणावाचा आहे थेट संबंध! जाणून घ्या नवे संशोधन काय सांगते?
पुढारी वृत्तसेवा
डिहायड्रेशन किंवा निर्जलीकरण म्हणजेच शरीरातील पाण्याची पातळी कमी होणं.
Canva
शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसल्यास त्याचा परिणाम रक्ताभिसरण, पेशींच्या कार्यावर होतो.
Canva
दिवसभरात पुरेसे पाणी पिणे हे तणावापासून तुमचे संरक्षण करु शकते, अस नवीन अभ्यास स्पष्ट झाले आहे.
Canva
डिहायड्रेशन आणि तणाव याबाबत ब्रिटनमधील लिव्हरपूल जॉन मूर्स युनिव्हर्सिटी येथील संशोधनकांनी अध्ययन केले. जर्नल ऑफ अप्लाइड फिजियोलॉजीमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.
Canva
संशोधनात असे आढळले की, दिवसभरात दीड लिटरपेक्षा कमी पाणी पिणार्यांना तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागतो.
Canva
संशोधनात कमी पाणी पिणार्यांमध्ये कॉर्टिसोल हार्मोनमध्ये वाढ आढळली. या हार्मोनला stress hormone असंही म्हटलं जातं.
Canva
संशोधनात असे आढळले की, तीव्र डिहायड्रेशनमुळे तणावात वाढ होवू शकते.
Canva
संशोधकांनी तरुण प्रौढांना दोन गटांमध्ये विभागले. एका गटाला दररोज दीड लिटरपेक्षा कमी पाणी पिण्यास दिले. तर दुसर्या गटाला अधिक पाणी पिण्यास दिले.
Canva
कमी पाणी प्यालेल्या गटामधील महिला आणि पुरुषांमधील कॉर्टिसोल हार्मोनमध्ये वाढ झाल्याचे आढळले.
Canva
WHO च्या मार्गदर्शनानुसार, दिवसभरात सरासरी पुरुषांनी अडीच तर महिलांनी २.२ लिटर पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे. मात्र तापमान आणि श्रम यानुसार यामध्ये बदलही अपेक्षित आहे.
Canva
येथे क्लिक करा.