Snake Facts | कोणता साप सर्वात धोकादायक : नाग, मण्यार की घोणस ?

अविनाश सुतार

संपूर्ण जगात 3000 हून अधिक प्रजातींच्या सापांपैकी केवळ 300 प्रजातीच धोकादायक आहेत

भारतात सुमारे 216 वेगवेगळ्या प्रजातींच्या सापांचा समावेश आहे, त्यापैकी 52 साप अत्यंत विषारी आहेत

नाग, मण्यार आणि घोणस या आशियातील तीन अत्यंत धोकादायक आणि महत्त्वपूर्ण सापांच्या जाती आहेत

नाग आणि घोणस या सापांचा एकदाच चावल्यावर जास्त विष पोहोचवण्याची क्षमता असते

मण्यारमध्ये विषाचे प्रमाण कमी असले तरी त्याचे विष खूप शक्तिशाली असते. त्यामुळे मृत्यू, कारणीभूत ठरू शकते

नाग चावल्यावर लवकर लक्षणे दिसून येतात, कारण विष लवकर शोषले जाते, तर मण्यार चावल्यावर लक्षणे उशिरा आणि समजून येत नाहीत

घोणस आणि मण्यार हे साप मानवांना जास्त प्रमाणात चावत असतात, त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही जास्त असते

नाग सर्वत्र आढळतात, पण तो चावण्याच्या घटना कमी प्रमाणात असतात. कारण त्याला ओळखणे सोपे असते, याचे विष न्यूरोटॉक्सिक असून मज्जासंस्थेवर परिणाम करते

मण्यार विशेषत: सर्वात धोकादायक असतात, कारण त्याची लक्षणे उशिरा समजतात आणि अनेक वेळा ते पेनलेस असतात, त्याची विषाची क्षमता अत्यंत उच्च दर्जाची असते

येथे क्लिक करा