मोनिका क्षीरसागर
जेवण बनवण्यासाठी मातीची भांडी सर्वात आरोग्यदायी मानली जातात, कारण त्यामध्ये अन्नातील पोषक घटक १००% टिकून राहतात.
काशाच्या भांड्यात जेवण बनवल्याने बुद्धी तल्लख होते आणि रक्ताची शुद्धी होण्यास मदत होते.
पितळी भांड्यांचा वापर केल्याने अन्नातील साधारण ९०% पोषक तत्वे सुरक्षित राहतात, मात्र ही भांडी वापरताना त्यांना आतून 'कलई' (Tin coating) असणे आवश्यक आहे.
लोखंडी भांड्यात भाजी केल्याने शरीराला नैसर्गिकरीत्या 'आयर्न' (Loha) मिळते, ज्यामुळे रक्ताल्पता (Anemia) होत नाही.
तांब्याच्या भांड्यात पाणी साठवणे फायदेशीर असते, पण यामध्ये आंबट पदार्थ किंवा दूध शिजवू नये, कारण त्याचे विषारी पडसाद उमटू शकतात.
आधुनिक काळात स्टेनलेस स्टीलची भांडी सुरक्षित मानली जातात, कारण ती अन्नासोबत कोणतीही रासायनिक प्रक्रिया करत नाहीत.
ॲल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते, कारण यामुळे हाडे ठिसूळ होण्याची शक्यता असते.
नॉन-स्टिक भांड्यांवरील टेफ्लॉन कोटिंग आरोग्यासाठी अपायकारक असते, त्यामुळे त्याचा वापर शक्यतो टाळावा.
निरोगी आयुष्यासाठी पारंपरिक मातीची, लोखंडी किंवा कलई केलेली पितळी भांडी वापरणे हा उत्तम पर्याय आहे.