मीठ ओलसर होतंय? बरणीत 'हे' दाणे ठेवल्यास मीठ राहील कोरडं अन् मोकळं

मोनिका क्षीरसागर

हवेतील आर्द्रतेमुळे मिठाला पाणी सुटते आणि ते डब्यात चिकटून खराब होऊ लागते.

मिठाच्या बरणीत तांदळाचे थोडे दाणे टाकल्यास ते मिठातील अतिरिक्त ओलावा शोषून घेतात.

तांदळाऐवजी तुम्ही मिठाच्या डब्यात राजम्याचे काही दाणे देखील ठेवू शकता, ज्यामुळे मीठ ओलसर होत नाही.

डब्यात लवंग टाकल्याने सुद्धा मिठाला ओलावा धरत नाही आणि मिठाचा दर्जा टिकून राहतो.

मिठाची बरणी नेहमी काचेची असावी, कारण प्लास्टिकच्या तुलनेत काचेमध्ये ओलावा कमी शिरतो.

जर मीठ जास्तच ओलं झालं असेल, तर ते हलक्या आचेवर कढईत थोडे भाजून घेतल्यास पुन्हा रवाळ होते.

हे छोटेसे 'दाणे' मिठात ठेवल्यास तुमचे मीठ वर्षभर अगदी मोकळं आणि स्वच्छ राहील.

येथे क्लिक करा...