bird speed facts : पृथ्वीवरील दुसरा सर्वात वेगवान पक्षी कोणता?

पुढारी वृत्तसेवा

सुवर्ण गरुड हा जगातील दुसरा सर्वात वेगवान पक्षी आहे.

सुवर्ण गरुडचे पंख खूप रुंद असतात आणि त्याच्या मानेवर विशिष्ट सोनेरी पिसे असतात.

ससे किंवा अन्‍य शिकारीला पकडण्यासाठीच्‍या झेपेदरम्यान तो २०० मैल प्रति तास इतका प्रचंड वेग गाठतो.

या गरुडाला डोंगर, दऱ्या आणि गवताळ प्रदेशांसारखे खडबडीत, मोकळे प्रदेश आवडतात.

सुवर्ण गरुड कड्यांवर किंवा झाडांवर मोठे घरटे बांधतो.

या पक्षाच्‍या आकारामुळे, तपकिरी रंगामुळे आणि सोनेरी मानेमुळे त्याला सहज ओळखता येते. तो इतर शिकारी पक्ष्यांपेक्षा वेगळा ठरतो.

सुवर्ण गरुडची चोच मजबूत आणि वाकडी असते; त्याचे पिवळे पाय मोठे असून त्यावर शक्तिशाली काळे नखे असतात.

सुवर्ण गरुड हा पक्षी उत्तर अमेरिका (विशेषतः पश्चिम भाग), युरोप, आशिया आणि उत्तर आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर आढळतात.

येथे क्‍लिक करा.