पुढारी वृत्तसेवा
भारतात शेकडो भाषा बोलल्या जातात. पण हिंदीनंतर सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती, माहिती आहे का?
भारत म्हणजे भाषांचं वैविध्य
भारतामध्ये शेकडो भाषा आणि हजारो बोली आहेत. प्रत्येक भाषेची स्वतःची संस्कृती आणि ओळख आहे.
जगभरात ७१०० पेक्षा जास्त भाषा
संपूर्ण जगात ७१०० हून अधिक भाषा बोलल्या जातात. त्यापैकी तमिळ आणि संस्कृत या सर्वात प्राचीन भाषांमध्ये गणल्या जातात.
हिंदीनंतर दुसऱ्या क्रमांकावर कोण?
भारतात हिंदीनंतर सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे बंगाली (बांग्ला).
किती लोक बोलतात बंगाली?
भारतात सुमारे ९.७२ कोटी लोक बंगाली भाषा बोलतात.
बांग्लादेशचीही राष्ट्रभाषा
बंगाली ही केवळ भारतातच नाही, तर बांग्लादेशचीही राष्ट्रीय भाषा आहे.
गोडवा असलेली भाषा
बंगाली भाषा तिच्या मधुर उच्चारांसाठी आणि गोड बोलण्यासाठी ओळखली जाते.
रवींद्रनाथ टागोरांमुळे जागतिक ओळख
रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्यामुळे बंगाली भाषेला जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली.
जगातील सातवी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा
आज जगभरात २३ कोटींहून अधिक लोक बंगाली भाषा बोलतात. ही जगातील सातवी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा मानली जाते.
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवसाशी संबंध
१९५२ च्या बंगाली भाषा आंदोलनाच्या स्मरणार्थ UNESCO ने २१ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस घोषित केला.