पुढारी वृत्तसेवा
द्राक्षे जीवनसत्त्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ आणि अँटिऑक्सिडंट्ससारख्या अनेक महत्त्वाच्या पोषकद्रव्यांनी समृद्ध असतात
हिरवी, काळी आणि लाल अशी तीन प्रकारची द्राक्षे लोकप्रिय आहेत, प्रत्येक प्रकाराच्या द्राक्षांचे पोषणमूल्य वेगवेगळे असते
एक कप हिरव्या द्राक्षांमध्ये १०४ कॅलरीज, १.४ ग्रॅम प्रथिने, ०.२ ग्रॅम चरबी, २७.३ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात
हिरवी द्राक्षे व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K आणि पोटॅशियमने समृद्ध आहेत. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, हाडे मजबूत ठेवणे आणि हृदयाचे आरोग्य राखणे यासाठी ती उपयुक्त ठरतात
एका कप काळ्या द्राक्षांमध्ये १०४ कॅलरीज, १.१ ग्रॅम प्रथिने, ०.२ ग्रॅम चरबी, २७.३ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. त्याचबरोबर व्हिटॅमिन C, K आणि पोटॅशियमही असते
काळी द्राक्षे रेस्व्हेराट्रॉलसारख्या अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढा देतात, हृदयाचे आरोग्य सुधारतात, जळजळ कमी करतात
एका कप लाल द्राक्षांमध्ये १०४ कॅलरीज, १.१ ग्रॅम प्रथिने, ०.२ ग्रॅम चरबी, २७.३ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात
लाल द्राक्षे रेस्व्हेराट्रॉल आणि अँथोस्यानिन्ससारख्या अँटिऑक्सिडंट्सने भरलेली असतात, त्यामुळे तणाव कमी करण्यात आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यात मदत करतात. व्हिटॅमिन C, K आणि पोटॅशियम मुबलक असते
तिन्ही प्रकाराची द्राक्षे आरोग्यासाठी चांगली असली तरी काळी आणि लाल द्राक्षे अँटिऑक्सिडंट्सच्या जास्त प्रमाणामुळे थोडीशी सरस मानली जातात