Rahul Shelke
मतदान केल्याचा पुरावा म्हणून डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. यामुळे एकाच व्यक्तीने पुन्हा मतदान करू नये, असा त्यामागचा हेतू आहे.
ही खास ‘इंडेलिबल इंक’ असते. सुरुवातीला जांभळी आणि नंतर काळी पडणारी ही शाई सहज निघत नाही.
15 जानेवारीच्या मतदानादरम्यान अनेक ठिकाणी “शाई पुसली जाते” अशा तक्रारी समोर आल्या.
जर शाई पुसली जात असेल तर एकच व्यक्ती पुन्हा मतदान करु शकते का? हा प्रश्न मतदारांमध्ये निर्माण झाला आहे.
नाही. जगातील सुमारे 90 देशांमध्ये मतदानानंतर हीच शाई वापरली जाते.
जगातील अनेक देशांना ही पुसली न जाणारी शाई भारतातूनच निर्यात केली जाते.
भारतामध्ये ही शाई दोन ठिकाणी तयार होते, हैदराबादमधील रायुडू लॅबोरेटरी आणि म्हैसूरमधील Mysore Paints & Varnish Ltd
देशातील बहुतांश निवडणुकांसाठी निवडणूक आयोग म्हैसूर पेंट्सची शाई वापरतो.
2014 नंतर बाटलीतील शाई ऐवजी मार्कर स्वरूपात इंडेलिबल इंक वापरली जाते.
नाही. पल्स पोलिओ मोहिमेतही लसीकरण झालेल्या मुलांच्या बोटावर हीच शाई लावली जाते.